TheStatusKing.Com

Marathi Suvichar For Students | मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी

Marathi Suvichar For Students: आज आम्ही जे सुविचार शेअर करत आहोत ते खास आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी (Students) काही गुण आत्मसात करायला हवेत जे त्यांच्या भावी आयुष्यात खूप उपयोगी पडतात. पुढील Suvichar हे अशाच काही गुणांवर आधारीत आणि प्रेरणादायी आहेत. हे सुविचार आपल्या सर्व विद्यार्थी मित्राना नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना यातून काही शिकण्यास मिळेल.

Marathi Suvichar For Students

पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.



संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.



ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.



दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो



ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.



राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.



दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.



शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.



वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.



त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.



Marathi Thoughts/Quotes For Students

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.



पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.



जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. पण जो शिष्य नसेल, तो गुरू ही नसेल.



क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.



सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.



विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो



“आयुष्यात ‘पैसा’ म्हणजे सर्वकाही नाही” असं म्हणण्यापूर्वी पुरेसा ‘पैसा’ कमवा



मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही



प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं, तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका



सगळे वार परतवता येतात पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही. आणि पचवताही येत नाही



विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार

"होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिहांच काळीज लागतं"



केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.



यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.



कष्ट इतक्या शांततेत कराव कि यश धिंगाणा घालेल



दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस



वेळ आणी शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहे, कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात, पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते............



छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही... अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते... कारण... छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात... पण... अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो.....!



पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण.... जिंकला तर.... स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल, आणि....... हरला तर स्वतःचाच अहंकार हाराल . . .



यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका.



अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.



विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मराठी सुविचार

अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.



आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.



एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.



कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.



कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यास कुचराई करु नका.



कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.



कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल , तर अपयश पचविण्यास शिका.



चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.



जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.



जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.



जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.



तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !